प्रतिनिधी/ पणजी
सहकार क्षेत्र ही एक भारतातील सर्वात मोठी चळवळ आहे. त्याला बळकट करण्याचे काम अशा सहकारी संस्था करत आहे. दि पीर्णा अर्बन को ऑपरेटीव्ह सोसायटी ली.च्या गोव्यात एकूण 11 शाखा आहेत. यामधील भाघधारक आणि संचालक हे सर्व एकत्र येऊन काम करत असल्याने ही चळवळ यशस्वी झाली आहे. सहकार क्षेत्र हा भारताचा कणा आहे असे उद्गार सहकार मंत्री गोविंद गावडे यांनी काढले.
दि पीर्णा अर्बन को ऑपरेटीव्ह सोसायटी ली. पणजी शाखेच्या सथलांतरित कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. पाटो पणजी येथील गेरा इमारतीत कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे. यावेळी बँकेचे अध्यक्ष नरेश सावळ, पणजी महानगरपालिकेचे महापौर उदय मडकईकर आणि सर्व संचालक तसेच बँक कर्मचारी वर्ग आणि हितचिंतक उपस्थित होते. प्रसंगी मंत्री गोविंद गावडे यांनी शुभेच्छाही दिल्यात.
बॉक्स करणे
गोव्याने क्रिडा क्षेत्रावर अधिक भर देण्याची गरज
पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. करनम मल्लेश्वरी यांनी गोवा सरकारकडे ‘वेटलिफ्ढटींग ऍण्ड पावरलिफ्ट अकादमी’ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी आवाहनही केले आहे की गोव्यात ही अकादमी शक्य होत नसेल तर आपल्या अकादमीत गोमंतकीय मुलांना पाठवावे, आपण त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयार करणार. गोव्यात क्रिडा क्षेत्राला चांगला वाव असून अनेक मुले आज क्रिडा क्षेत्रात आपले नाव कमवत आहेत. ज्या पालकांना आपल्या मुलांना या अकादमीत पाठवायचे असेल तर त्यांनी पाठवावे. सरकार या मुलांचा सर्व खर्च करेल असेही मंत्री गावडे म्हणाले. गोवा सरकारने क्रिडा क्षेत्रावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला पाठींबा
प्रियोळ मतदारसंघात आपण अपक्ष असलो तरी आज आपण भाजप सरकाराशी संबंधित आहे. त्यामुळे जिल्हा पंचायत निवडणुकीला आपला पाठींबा हा भाजपलाच असेल.