प्रतिनिधी /पणजी
सांस्कृतिक व इतर क्षेत्रातील सुमारे 6 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. तसेच त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे व सरचिटणीस दामू नाईक हे यावेळी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत पुष्प देऊन तसेच पक्षाचा शेला गळय़ात घालून त्यांना प्रवेश देण्यात आला.
दीपक तिळवे, काजर चोडणकर, सिद्धार्थ तिळवे, हरीश नास्नोडकर, प्रकाश बामणे, रुतेश वेर्णेकर, अशी भाजपात प्रवेश केलेल्यांची नावे आहेत. तरुण पिढी भाजपाकडे आकर्षित होत असल्याचा दावा नाईक यांनी केला.
तानावडे यांनी भाजपात प्रवेश केलेल्यांचा थोडक्यात परिचय करून दिला. ते विविध क्षेत्रात कार्यरत असून सामाजिक क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. राजकीय पक्षाच्या व्यासपीठावरून सेवा पुढे न्यावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी भाजपाची निवड केल्याची माहिती प्रवेश केलेल्या कर्यकर्त्यांनी यावेळी दिली. विविध क्षेत्रातील अनेक लोक भाजपात येण्यास इच्छुक असून ते लवकरच भाजपात प्रवेश करतील, प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी सांगितले.