प्रतिनिधी/ डिचोली
रवींद्र भवन सांखळीतर्फे शिवजयंती उत्सव रविवार दि. 19 रोजी साजरा करण्यात येणार आहे या निमित्त निमंत्रित सवेष नाट्या स्पर्धेचे आयोजन तसेच शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती रवींद्र भवनचे उपाअध्यक्ष विठोबा घाडी यांनी दिली. यावेळी रवींद्र भवनचे संचालक दामोदर सातोडकर, स्वाती माईणकर, सुनील सिनारी, कृष्णा गावस, आदी उपस्थित होते.
सांखळी मर्यादित सवेष नाट्या स्पर्धा दु. 3 वा. सुरू होईल. यात कमीतकमी सात व त्याहून अधिक जणांना सहभाग घेता येईल. विजेत्या स्पर्धकास तीस हजार, पंचवीस हजार व वीस हजार रू. आदी बक्षिसे देण्यात येतील. तसेच सहभागी पथकास पंधरा हजार प्रवास खर्च देण्यात येईल.
यावेळी उदघाटनास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत असतील. त्यांचे यावेळी घोड्यावरून विशेष स्वागत करण्यात येणार आहे. बक्षिसवितरण त्याचदिवशी होईल.
सोम. दि. 20 रोजी संध्या. 7 वा. स्वराज्य धर्म (महालक्ष्मी युवक संघ तळावली यांच्यातर्फे) माहिती प्रसिद्धी खाते व रवींद्र भवन सांखळीतर्फे सादर होणार आहे. या उत्सवास उपस्थिती लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे.