सुर्ला जोशीभाट येथे घरावर झाड पडले
प्रतिनिधी / सांखळी
सांखळी शहरासह ग्रामीण भागात शनिवारीपासून जोरदार पाऊस सुरू आहे, यामुळे नागरिकांना बऱयाच समस्यांना सामोरे जावे लागले. सांखळी ते होंडा आणि फोंडा जाणाऱया मुख्य रस्त्याच्या दुतर्फा गटारे न उपसल्याने मुख्य रस्त्यावरून पाणी वाहत आहे. यामुळे रास्ता खराब होऊन सरकारचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच सुर्ला जोशीभाट येथे राधा सतोडकर या महिलेच्या घरावर झाड पडून एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती डिचोली मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी दिली.
मुख्र रस्त्याची गटारे उपसण्यास सुरुवात
सांखळी ते होंडा आणि होंडा ते उसगाव या मुख्य रस्त्याच्या बाजूची गटारे साफ न केल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. यावर वेळीच उपाय योजना न केल्यास पूर्ण रस्ता खराब होऊन सरकारचे मोठ नुकसान होण्याची शक्मयता व्यक्त आहे, अशी बातमी तरुण भारत मध्ये प्रसिद्ध होताच काही पंचायत सदस्यांनी स्वतः उपसण्यासाठी पुढाकार घेतला. सरकारी संबंधित अधिकाऱयांनी याची पाहणी करून ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे
सुर्ला जोशीभाट येथे महिलेच्या घरावर कोसळले झाड
सुर्ला जोशीभाट येथील राधा सतोडकर याच्या घरावर झाड कोसळल्याने मामलेदार प्रावीणजय पंडित यांच्या नेतृत्वाखाली तलाठी प्रेमय मिरिंगकर यांनी एक लाख रुपये नुकसान झाले, अशी माहिती दिली. स्थानिक पंच सुभाष फोंडेकर यांनी ही राधा सतोडकर यांना दिलासा दिला