मुख्यमंत्र्यांनी घरावर फडकवला भाजपचा झेंडा
सांखळी/प्रतिनिधी
आज संपूर्ण देशासह सांखळी शहरातील भाजप कार्यालयात भारतीय जनता पक्ष स्थापना दिवस साजरा करण्यात आला. तसेच मतदारसंघातील पन्नासही बूथ वर खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्याचप्रमाणे पाळी, वेळगे, सुर्ल, कुडणे, आमोणा, न्हावेली, हरवळे आणि नगर पालिका क्षेत्रांतही स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या वेळी सांखळी भाजप मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, सुभाष मळीक, गुरुप्रसाद नाईक, कालिदास गावस, सुभाष फोंडेकर, गणेश घाडी, प्रदीप गावडे, चंद्रकांत घाडी, सुविधा पेडणेकर, आनंद काणेकर, यशवंत माडकर, दयानंद बोर्येकर, महेश गवंडे, शोभा आमडकर, दीपक नाईक, इत्यादी अनेक कार्यकर्त्यांनी आपआपल्या परिसरात भाजपचा स्थापना दिवस साजरा केला. बहुतेक कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर भाजपचा झेंडा फडकवला.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या घरावर भाजपचा झेंडा फडकवला
सांखळी मतदारसंघाचे आमदार आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी भारतीय जनता पक्ष स्थापना दिनानिमित्त आपल्या सांखळी येथील घरावर भाजपचा झेंडा फडकवला. या वेळी सुलक्षणा सावंत ही उपस्थित होत्या.
संघटित काम केल्यास त्याचा भविष्यात चांगला उपयोग साध्य करता येतो. प्रथम राष्ट्र या धर्तीवर चालणारे आपले सरकार असून प्रत्येक माणसाचे मार्गदर्शन आणि सहकार्य आम्हाला हवे आहे. राज्यातील जनतेचे आम्ही सेवक आहोत. भारतीय संस्कृती आणि भारतीय जनता पक्ष सर्वांना बरोबर घेऊन जाणार असून आमच्या सारखे सेवक असताना भीती बाळगण्याची काहीही गरज नाही, असे भाजप कार्यकत्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही या वेळी आपले विचार मांडले.