इस्लामपूरची ‘एक्सपायरी डेट’ द्वितीय तर कोल्हापूरची ‘इट हॅपन्स’ तृतीय : सातोसे सरपंच करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
वार्ताहर / सातार्डा:
सातोसे येथील श्री देवी माऊली कला-क्रीडा मंडळातर्फे आयोजित केलेल्या सरपंच करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत समांतर सांगली-विश्रामबागच्या ‘शेवट तितका गंभीर नाही’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावित सरपंच करंडकावर नाव कोरले. द्वितीय पारितोषिक राजाराम बापू इन्स्टिटय़ूट इस्लामपूरच्या ‘एक्सपायरी डेट’ने तर तृतीय पारितोषिक गायन समाज देवल क्लब कोल्हापूरच्या ‘इट हॅपन्स’, एकांकिकेने पटकावला. सांघिक उत्तेजनार्थ पारितोषिक कलासक्त मुंबईच्या ‘ओल्या भिंती’ने तर लक्षवेधी एकांकिकेचे पारितोषिक भवन्स् महाविद्यालय अंधेरी-मुंबईच्या पत्रावळीने पटकावले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे. दिग्दर्शन – प्रथम – इरफान मुजावर (शेवट तितका गंभीर नाही), द्वितीय – ऋषीकेश जाधव (एक्सपायरी डेट-इस्लामपूर), तृतीय – अनुपम दाभाडे (इट हॅपन्स्-कोल्हापूर), पुरुष अभिनय प्रथम-मयुर पाटील (शेवट तितका गंभीर नाही-सांगली), द्वितीय ऋषीकेश जाधव (एक्सपायरी डेट-इस्लामपूर), तृतीय – प्रमोद अनिल पुजारी (इट हॅपन्स्-कोल्हापूर), उत्तेजनार्थ-ओंकार कारापूरकर (मी आई का नाही-काकुलो कॉलेज म्हापसा), मिलिंद कासार (नाते संबंध-आविष्कार सावंतवाडी), तेजस म्हस्के (दहन आख्यान-बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ). स्त्राr अभिनय प्रथम – आसावरी नागवेकर (इट हॅपन्स्-कोल्हापूर), द्वितीय-प्रणाली पाटील (एक्सपायरी डेट-इस्लामपूर), तृतीय-ज्ञानदा खोत (पालवी-पाटकर वर्दे महाविद्यालय मुंबई), उत्तेजनार्थ -गायत्री नाईक (पत्रावळी-भवन्स महाविद्यालय अंधेरी), गायत्री गिरीश देव (इट हॅपन्स्-कोल्हापूर), कांदबरी माळी (मोठा पाऊस आला).
पार्श्वसंगीत – प्रथम – वैष्णवी शेटये (शेवट तितका गंभीर नाही-इस्लामपूर), द्वितीय – शुभम राणे (एक्सपायरी डेट-इस्लामपूर), हर्षवर्धन जोशी (दहन आख्यान-बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ), प्रकाश योजना – प्रथम – रोहन सुनील घोरपडे (इट हॅपन्स्-कोल्हापूर), पवन लोढे (एक्सपायरी डेट-इस्लामपूर), प्राजक्ता पाटील (शेवट तितका गंभीर नाही-सांगली), नेपथ्य प्रथम – इरफान मुजावर (शेवट तितका गंभीर नाही-इस्लामपूर), द्वितीय निखील पळसे (एक्सपायरी डेट), तृतीय अश्विन दीपक मगदूम (इट हॅपन्स्-कोल्हापूर). स्पर्धेचे परीक्षण गोव्यातील ज्येष्ठ रंगकर्मी देविदास आमोणकर व संतोष शेटकर यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण रंगकर्मी सुरेंद्र कलंगुटकर, ज्ञानदीप राऊळ, सरपंच बबन सातोसकर, मंडळाचे अध्यक्ष सुजित सरदेसाई, प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर, देवस्थान समिती अध्यक्ष वसंत धुरी, स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते सुधीर भगत, भिकाजी केरकर, मंडळाचे पदाधिकारी दाजी मांजरेकर, सुजन नागवेकर, धर्मा मेस्त्राr, सर्वेश कामत, संतोष धुरी, राजू नागवेकर, सुरज सातोसकर, निखिल पेडणेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण मांजरेकर यांनी केले. दरम्यान, उद्योजक दत्ता कवठणकर, कवठणी उपसरपंच अजित कवठणकर, आप्पा राऊळ यांनी स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यातील नामवंत 12 संघांनी सहभाग घेतला होता.