संख / वार्ताहर
जत तालुका अंकलगी येथील युवक खलाटी फॉरेस्टमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत भीमराव रामु चौगुले वय २२ वर्षे राहणार अंकलगी चौगुले वस्ती अविवाहित तरुणाने खलाटी येथे फॉरेस्ट परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जत पोलीस ठाणे येथे रविवारी दि.२१ रोजी सकाळी १० वाजता मयत दाखल.
अधिक माहिती अशी की पोलीसाकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती मयत भीमारामव रामू चौगुले हा रविवारी सकाळी सात वाजता घरातून वाडी येथे जाऊन येतो म्हणून घरातील दोन हजार रुपये घेऊन निघून गेला आहे अद्याप रात्री परत न आल्यामुळे घरातील लोकांनी शोधा शोध करत होते.
सदर जत पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की खलाटी फॉरेस्ट परिसरात भीमराव रामू चौगुले यांनी हा गळफास घेतल्याचे खलाटी येथील फिर्यादी संतोष आकाराम नाईक यांनी फोनवरून जत पोलीस ठाणेस वर्दी दिली. घटनास्थळी पोलिस जाऊन पंचनाम व शवविच्छेदन करून नातेवाईकाच्चा ताब्यात देण्यात आले. अधिक तपास स.पो.फौ. रुपनूर करत आहेत.