ऑनलाईन टीम / सांगली :
वारणा, कोयना धरणासह कृष्षेत येणाऱ्या सहा धरणातील विसर्ग दिड लाख क्युसेस आहे. धरण पाटलोट क्षेत्रात संततधार सूरु आहे या पाश्वभूमीवर आज सांयकाळपर्यत कृष्णा नदी सांगलीत आयर्विन पूलाजवळ 38 ते 40 फुटावरुन धावू लागेल असा इशारा आपत्ती निवारण कक्षाने दिला आहे. आष्टा व सांगली येथे एन डी आर ची पधके सुसज्ज ठेवण्यात आली आहेत.
कृष्णा नदीत विसर्ग येणारी कोयना, वारणा,तारळी, धोम कण्हेर उरमोडी या धरणातून एकत्रीत सुमारे दिड लाख विसर्ग सुरु आहे.नदी काठच्या गावाना सावधानता व सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कृष्णा नदी इशारा पातळीकडे झेपावते आहे. पावसाने उघडीप देणेची गरज आहे पण आजही अनेक ठिकाणी सूर्यदर्शन नाही. पावसाची रिपरिप सुरुच आहे. जनजीवन महापूराच्या संभाव्य धोक्याने धास्तवले आहे.