प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील खटाव येथील कोविड विलगीकरण कक्षातील एका कोरोना रुग्णाने पलायन केले आहे. खटाव जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये मंगळवारी विलगीकरण कक्षामध्ये चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यात आले होते. मात्र, या चारपैकी बुधवारी दुपारी एका रुग्णाने आपत्ती व्यवस्थापन समितीला न सांगताच विलगीकरण केंद्रातून पलायन केले आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
खटाव गावातील पॉझिटीव्ह रुग्ण कमी होण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यातच अशा प्रकारे विलीगीकरण कक्षातून रुग्णाने पळ काढल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन समिती या पळून गेलेल्या कोरोना रुग्णांचा शोध घेत आहेत.