सांगली /प्रतिनिधी
गुंठेवारी चळवळ समितीच्यावतीने मंगळवारी सांगलीत महापालिका कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले. गुंठेवारी मधील नागरिकांना प्रमाणपत्र, ना हरकत दाखले आणि अधिकाऱ्यांकडून होणारी चालढकल व लोकांची होणारी लुबाडणूक आदी मागण्यांकडे महापालिका प्रशासन व आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. गुंठेवारी चळवळ समितीचे चंदन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयासमोर अधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
यावेळी मागण्यांचेनिवेदन मनपा अधिकाऱ्यांना देण्यातआले. या आंदोलनात गुंठेवारी भागातील नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी सांगली शहर पोलीस ठाण्याकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.