शुक्रवार रात्रीपासूनच अंमलबजावणीला सुरुवात
शनिवारी पहाटेपासून नागरिकांच्या फिरण्यावर मज्जाव : हुल्लडबाजांच्यावर कारवाई सुरू
प्रतिनिधी / सांगली
राज्यशासनाने विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱयाविरोधात कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार शुक्रवारी रात्रीपासूनच सांगली शहरात या विपेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरात प्रत्येक चौकाचौकात पोलीसांनी ठाण मांडले आहे. विनाकारण रस्त्यावर बाहेर फिरणाऱ्यांच्याविरोधात आता पोलीसांनी दंडुका उगारला आहे. या विकेंड लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी आणि सर्व सांगलीकरांनी पाठिंबा दिला असल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट होता.
सांगली शहरातील नाक्यानाक्यावर पोलीस फौजफाटा लावण्यात आल्याने सांगलीकर विनाकारण बाहेर पडण्याचा फंदात पडताना दिसून येत नाहीत. सांगली शहरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि आस्थापणा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे सांगली शहरातील बाजारपेठेत तुरळक अशी गर्दी दिसून येत आहे. तसेच सांगली एस.टी. स्टँडवरही शुकशुकाट आहे. दत्त मारूती रोड, कापडपेठ, गणपती पेठ, सांगली मिरज ररस्ता, विश्रामबाग चौक, शंभरफुटी रोड, पंचमुखी मारूती रोड या सर्व ठिकाणी शांतता होती. पोलीसांनी काही भागात संचालन करून नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे सांगली शहरात विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राजवाडा चौक, स्टेशन चौक, काँग्रेस कमिटी चौक, राममंदिर अशा गर्दीच्या चौकात पोलीसांशिवाय कोणीही दिसून येत नव्हते. हॉटेल, पानटपऱया पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर भाजी विक्रेत्यांना मुभा देण्यात आली आहे पण तीही सोशल डिन्स्टिसिंगचे पालन करून त्यामुळे याठिकाणीही गर्दी कमी आहे.