277 कोरोनामुक्तः सांगली शहरात 47 वाढलेः वाळवा तालुक्यात 76 वाढले
प्रतिनिधी / सांगली
जिल्ह्यात सलग सातव्या दिवशी कोरोनाने सहा जणांचा बळी गेला आहे. तर सोमवारी गेल्या सहा महिन्यात सर्वाधिक असे 526 रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरात 47 तर मिरज शहरात 27 रूग्ण वाढले आहेत. उपचार सुरू असणारे 277 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या उपचारात चार हजार 49 रूग्ण आहेत.
महापालिका क्षेत्रात 74 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महापालिका क्षेत्रात सातत्याने रूग्ण वाढताना दिसून येत आहेत. सोमवारी सांगली शहरात 47 तर मिरज शहरात 27 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आजअखेर 18 हजार 888 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 85 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. तर उपचारातील रूग्णसंख्येचा आकडा वाढतच चालला आहे.
ग्रामीण भागात 452 रूग्ण वाढले
ग्रामीण भागात रूग्णसंख्येचा उद्रेक सुरू झाला आहे. प्रत्येक तालुक्यात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. ग्रामीण भागात तर तब्बल 452 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये वाळवा तालुक्यात सर्वाधिक असे 76 रूग्ण आढळून आले आहेत. आटपाडी तालुक्यात 28 रूग्ण वाढले आहेत. जत तालुक्यात 43, कवठेमहांकाळ तालुक्यात 31, मिरज तालुक्यात 39 तर शिराळा तालुक्यात 45 रूग्ण वाढले आहेत. कडेगाव तालुक्यात 51 तर खानापूर तालुक्यात 57 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 22 तर तासगाव तालुक्यात 60 रूग्ण वाढले आहेत.
सहा जणांचा मृत्यू
जिल्ह्यात सलग सातव्या दिवशी उपचार सुरू असणाऱया सहा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जत तालुक्यातील दोघांचा तर वाळवा तालुक्यामधील एकाचा मृत्यू झाला आहे. सांगली शहरात दोन रूग्ण दगावले आहेत. तर खानापूर तालुक्यात एकाचा मृत्यू झाला आहे. आजअखेर एक हजार 852 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर 3.65 टक्के झाला आहे.
277 कोरोनामुक्त
जिल्ह्यात कोरोनाचे उपचार सुरू असणारे 277 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिल्ह्यात 56 हजार 80 रूग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. तर त्यातील 50 हजार 179 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नवे रूग्ण 526
उपचारात 4049
बरे झालेले 50179
एकूण 56080
मृत्यू 1852
सोमवारचे बाधित रूग्ण
तालुका रूग्ण
आटपाडी 28
कडेगाव 51
खानापूर 57
पलूस 22
तासगाव 60
जत 43
कवठेमहांकाळ 31
मिरज 39
शिराळा 45
वाळवा 76
सांगली शहर 47
मिरज शहर 27
एकूण 526