प्रतिनिधी/सांगली
सांगली शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या फौजदार गल्ली येथे कंटेनमेंट झोनमध्ये बंदोबस्तास असलेल्या पोलिसांचा फौजदार गल्ली येथील नागरिकांच्या वतीने मंगळवारी सत्कार करण्यात आला.
गेल्या 28 दिवसापासून 24 तास अखंडपणे बंदोबस्ताचे काम चोखपणे पार पाडण्याचे काम या पोलिसांनी केले. कोरोना प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या फौजदार गल्ली या परिसराचा 28 दिवसाचा कालावधी मंगळवारी पूर्ण झाला यानिमित्ताने तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री यांच्या हस्ते पोलिसांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर नगरसेवक करीम मिस्त्री मंगेश चव्हाण संयोजक युनुस महात विपुल केरीपाळे लालू मिस्त्री अमन पठाण जावेद महात नासिर भाई जमादार डॉक्टर अनिल जुमराणी. आदी उपस्थित होते.