आई आणि बापाला त्रास देत होता म्हणून काढला काटाः बापाला व त्याच्या साथीदाराला केली अटकः सांगली ग्रामीण पोलीसांची कारवाई
प्रतिनिधी / सांगली
मिरज तालुक्यातील कवलापूर येथील विजय विकास पवार वय 21 या युवकाचा खून त्याच्याच बापाने केला असल्याचे उघड झाले आहे. वारंवार आई आणि बापाला त्रास देत असल्याने बापानेच एका साथीदाराच्या मदतीने काटा काढला आहे. या मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून हा मृतदेह सोलापुर जिल्हÎातील सांगोला तालुक्यातील सोपान जनार्दन गडदे यांच्या शेतीलगत असलेल्या तलावमध्ये टाकला. या प्रकरणांचा उलगडा सांगली ग्रामीण पोलीसांनी केला असून या प्रकरणी या मुलाचा बाप विकास बाबु पवार वय-45 रा, कवलापुर ता मिरज जि सांगली
आणि त्याचा साथीदार उत्तम मदने वय-28 रा कोळे ता सांगोला जि सोलापुर याला अटक करून त्यांना सांगोला पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, 15 जुलै रोजी सांगोला पोलीस ठाणे हदीतील सोपान जनार्दन गडदे याचे मालकीच्या शेतीलगत असलेल्या बंध्देहाळ तलावमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचे हत्याराने डोके कापुन पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने डोके नसलेले खांदयापासुन भाग असलेले प्रेत हिरवे पांढ-या रंगाच्या चटईमध्ये व निळया व लाल रंगाच्या शेडनेटमध्ये सफेद रंगाच्या दोरीने त्यास एका मोठया दगडास बांधुन बध्देहाळ तलावमध्ये आढळून आले होते. त्यानंतर याबाबत सांगोला पोलीसांच्याकडून या खुनाचा शोध सुरू होता.
दरम्यान सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कवलापूर येथील एक युवक गायब असल्याची माहिती या पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार व त्यांच्या पथकाला मिळाली त्यानंतर त्यांनी त्यानुसार तपास सुरू केला असता गायब असलेल्या युवकाचे नाव विजय विकास पवार असल्याचे समजले व त्याचा खुन झाला असल्याची कुणकुण लागली त्यामुळे त्यांनी पवार याचे घरी जाऊन याबाबतची माहिती घेवून त्याच्या वडिलांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांच्या वडिलांनी उलटसुलट उत्तरे दिली. त्यामुळे त्याला ताब्यात घेतले त्यावेळी त्यांने आपणच आपल्या एका साथीदाराच्या मदतीने खून केल्याचे सांगितले आणि या मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याचा खून केल्याचे कबूल केले. त्यानंतर या प्रकरणी मयत विजय याचे वडिल विकास बाबु पवार आणि त्याचा साथीदार उत्तम मदने याला अटक करून या दोघांना सांगोला पोलीस ठाण्याकडे वर्ग केले आहे.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार सहाय्यक पोलीस फौजदार बाळकृष्ण गायकवाड पोहेकों रमेश कोळी पोना कपिल सांळुखे पोना महेश जाधव, आकाश गायकवाड ( संजयनगर पोलीस ठाणे ) यांनी हा खूनाचा उलगडा केला आहे.