२२ जणांच्या विरोधात विरोधात कारवाई साडेचार हजारांचा दंड वसूल
प्रतिनिधी / सांगली
माधवनगर जकात नाका येथे विनामास्क आणि लायसन्स नसणाऱ्या वाहनचालकांवर संजयनगर पोलीस ठाण्याकडून कारवाई केल्याची माहिती संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासो पाटील यांनी माहिती दिली.
सध्या जगभरात कोरोनाचे संकट असून सांगली व माधवनगर येथे पोलिसांची गर्दी असणाऱ्या ठिकाणांवर कडक कारवाई सुरू आहे. गेल्या काही दिवसापूर्वी कोरोना पेशंट वाढत होते. त्यामुळे माधवनगर बंद ठेवले होते. त्यानंतर लॉकडाऊन शिथिल होताच नागरिकांची बाजारपेठांमध्ये गर्दी झाली.
संजयनगर पोलिसांनी विनामास्क वाहनधारक आणि दुकानदार व फळविक्रेते येथे सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्याच्यावर कारवाई करून माधवनगर येथे गर्दीवर नियंत्रण आणले असून येथे नाकाबंदी सुरू आहे. महेश डोंगरे, प्रतिक्षा गुरव ,शंकर घुगरे, विक्रम जाधव यांनी ही कारवाई केली.