परस्पर विरोधी फिर्यादी, चौघे जखमी, 13 जणांवर गुन्हा
प्रतिनिधी / मिरज
मिरज-म्हैसाळ रस्त्यावरील म्हाडा कॉलनी येथे मंगळवारी सकाळी दोन गटात कुऱ्हाड आणि तलवारी घेऊन तुफान राडेबाजी झाली. दोन गट एकमेकांसमोर भिडल्याने युसूफ शेख यांच्यावर तलवार हल्ला झाला असून, जखमीवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत युसूफ अब्दूलगफार शेख (वय 47) आणि अबिद इब्राहीम शेख (वय 28, दोघे रा. बिस्मिल्ला कॉलनी, म्हैसाळ रोड) यांनी परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या असून, दोन्ही गटाकडील 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये हमीद शेख, इब्राहीम शेख, अबिद शेख, वहिदा हमीद शेख, फातिमा इब्राहीम शेख, मुजो हमीद शेख, युसूफ गफार शेख, मोहसीन युसूफ शेख, मुबारक युसूफ शेख, गुड्डू युसूफ शेख, रियाज महंमद शेख, अलताफ इब्राहीम शेख आणि अली इब्राहीम शेख या 13 जणांचा समावेश आहे.