प्रतिनिधी / सांगली
मध्य रेल्वेच्या बहुचर्चित पुणे मिरज ते लोंढा या मार्गावरील सांगली ते मिरज या दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे दुहेरी करण्याच्या कामाने आता वेग घेतला आहे. सांगली ते कराड यादरम्यान ताकारी ते शेणोली यादरम्यान दुहेरी करण्याचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे.
आता भिलवडी ते सांगली या दरम्यान दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. नजीकच्या काही महिन्यात हे काम पूर्ण करण्याचा रेल्वेचा मानस असल्याचे सांगण्यात आले.