प्रतिनिधी / सांगली
अस्वच्छते प्रकरणी सांगली येथील मे. द कॅपिटल किचन, मार्केटयार्ड समोर, मे. सुयोग आईस्क्रिम, मार्केटयार्ड समोर व मे. अपे बेकरी मेझॉनाइन फ्लोअर, प्रणोती अपार्टमेंट या तीन पेढींचे परवाने 27 ते 29 ऑगस्ट 2021 या तीन दिवसांकरिता निलंबित करण्यात आले आहेत. अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिली.
परवाने निलंबित कालावधीत हॉटेल, आईस्क्रिम व बेकरी व्यवसायिकांना कोणत्याही अन्न पदार्थांचा व्यवसाय करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरूध्द कायदेशीर कारवाई होवू शकते. या पेढींचे परवाने तपासणीअंती अस्वच्छते प्रकरणी निलंबित करण्या आले होते. पेढींनी निलंबन आदेशाविरूध्द आयुक्त मुंबई यांच्याकडे अपिल दाखल केले होते. सदरचे अपिल आयुक्त मुंबई यांनी अमान्य करून पेढींचे निलंबन आदेश कायम केले आहेत. त्याअनुषंगाने सदर पेढींचे परवाने. 27 ते 29 ऑगस्ट 2021 या तीन दिवसांकरिता निलंबित करण्यात आले असल्याचे. चौगुले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.