पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम
प्रतिनिधी / सांगली
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा दौऱ्याच्या निमित्ताने सांगली-इस्लामपूर रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
दिप मंगल कार्यालय, कवठेपिरान रोड, कसबे डिग्रज, येथे होणाऱ्या कार्यक्रमावेळी व्हीआयपी मोटार ताफ्यास कोणताही अडथळा निर्माण होवू नये, तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने इतर कोणतीही वाहने सदर ठिकाणी येवू नयेत यासाठी उद्या सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत लक्ष्मीफाटा ते कवठेपिरान रोडवरुन जाणारी वाहतूक समडोळी कमान येथून आनंदराज ढाब्यामार्गे सांगली-इस्लामपूरकडे वळविण्यात येत आहे. अशी माहिती गेडाम यांनी दिली आहे.