वाळवा / वार्ताहर
वाळवा येथे परमपूज्य श्री १०८ आचार्य विद्यासागर महाराजांचे शिष्य परमपूज्य श्री १०८ पावनसागरजी महाराज यांचे कोठभाग वाळवा जैन बस्तीमध्ये आगमन झाले असून, वाळवा नगरीमध्ये समस्त जैन बांधवांच्या वतीने मगदूम मेडिकलचे मालक राजेंद्र मगदूम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी अण्णा सत्याप्पा मगदूम, विद्याधर मगदूम, प्रकाश होरे, सुरेश होरे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. पावनसागरजी महाराजांचे वाळवा येथे भक्तांना भव्य सानिध्य लाभणार असून, त्यांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची वाळवा कोठभाग जैन बस्तीमध्ये गर्दी होताना दिसत आहे.