प्रतिनिधी / सांगली
वैद्यकिय क्षेत्रातील रोजगाराच्या संधीबाबत सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसाठी 23 जून रोजी दुपारी 11.30 ते 12.30 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी दिली.
कोविड-19 साथीच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी वेद्यकिय, पॅरामेडीकल क्षेत्रातील प्रशिक्षीत मानव संसाधनांची तीव्र कमतरता जाणवत असून मनुष्यबळांची पुर्तता करण्यासाठी खाजगी, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात मोफत प्रशिक्षण घेवू इच्छिणाऱ्या युवक, युवतींना मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेची माहिती व मार्गदर्शनाबाबत वेबीनार आयोजित करण्यात आला आहे. या वेबीनारमध्ये प्रमुख मार्गदर्शक सहायक आयुक्त ज. बा. करीम व मार्गदर्शन अधिकारी आ. बा. तांबोळी आहेत.
इच्छुक युवक व युवतींनी meet.google.com/bjn-dbei-beu वेबीनारच्या या लिंकवर विहीत वेळेत सहभागी व्हावे, असे आवाहन . करीम यांनी केले आहे.