एलसीबीच्या पथकाची कारवाई ; एकास अटक
प्रतिनिधी / सांगली
शेगाव (ता. जत) येथे एका शेतीमध्ये छापा टाकत स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेच्या पथकाने एक लाख २९ हजार रुपयांची गांजाची झाडे जप्त केली. याप्रकरणी तानाजी जगन्नाथ शिंदे (वय ६२, रा. शिंदे मळा, शेगाव, ता. जत) या शेतमालकास अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गुळवंची रस्त्यावर शिंदे यांचे शेत आहे. यामध्ये त्यांनी गांजाची लागवड केली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अक्षय बेंन्द्रे यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला.