सांगली / प्रतिनिधी
भिलवडी येथील चितळे डेअरी समोर बांधकाम चालु असलेले रात्रीच्या वेळी चोरलेली सळी चोरणारे दोघे संशयित आणि छोटा हत्ती असा तीन लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हा विभागाने केली.
याप्रकरणी राजेश ऊर्फ आदेश भिमराव जाधव वय-२७ रा, भिलवडी स्टेशन गोसावी गल्ली खंडोबा मदीर शेजारी ता पलुस जि सांगली आणि मोहन गुजर माळी रा भिलवडी स्टेशन गोसावीवाडी ता पलुस जि सांगली याना अटक करण्यात आली आहे. त्याचे कब्जातील छोटा हत्ती गाडी नं एम एच १० सी आर २३९५ चोरलेली बांधकाम संळी असा एकुन ३,६०,०००/- हजार रुपयाचा मुदेमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक रविराज फडणीस,पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, सपोफी मारुती साळुखे सुनिल चौधरी मच्छिद्र बर्ड, अजित चंद्रे. साहेल कार्तीयांनी कॅप्टन गुंडवाडे, अरुण सोकटे, यांनी पार पाडली.