भाटी येथील सिद्धा डेंगरावर विसावलेले पुरातन मंदिर, 4 रोजी दुपारी होणार उत्सवाची समाप्ती
प्रतिनिधी /सांगे
सांगे तालुक्मयातील भाटी येथील सिद्धा डोंगरावरील प्रसिद्ध श्री कणेरीसिद्ध देवाचा वार्षिकोत्सव गुरुवार 3 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या भागातील हे जागृत दैवत असून तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिराला चोहोबाजुंनी जंगलाने व्यापले आहे. 1425 फूट उंचावरील डोंगरावर महाशिवरात्रीनंतर दरवषी तिसऱया दिवशी ही जत्रा भरते. डोंगरावर जाऊन देवाचे दर्शन घेणे व तेथील परिसर न्याहाळणे यात वेगळाच आनंद भाविकांना मिळतो.
या डोंगराच्या माथ्यावर लहान आकाराचे कणेरीसिद्ध देवाचे मंदिर आहे. मंदिराच्या वरच्या बाजूस गुहा असून तिला ‘तीर्थहाणी’ म्हणून संबोधले जाते. तर मंदिराच्या काही अंतरावर खाली एक विहीर आहे. तिथे बारामाही पाणी उपलब्ध असते. भाविक हे पाणी तीर्थ म्हणून सेवन करतात. मंदिरातील धार्मिक कार्य भाटी येथील मठकर कुटुंबातील संदीप मठकर यांच्याकडून केले जाते. या देवाचे गावकर, वेळीपसह एकूण सात वांगडी आहेत, असे गावचे ज्ये÷ नागरिक सगुण गावकर यांनी सांगितले.
मध्यरात्री घातले जाते गाऱहाणे
सांगे तालुक्मयातील भाविकांबरोबर दूरवरचे भाविक येथे जत्रेला येत असतात. यात आबालवृद्ध, महिलांचाही समावेश असतो. यंदा ही जत्रा गुरुवार 3 रोजी सुरू होऊन शुक्रवार 4 रोजी दुपारी संपेल. अनेक भाविक रात्री डोंगरावर मुक्काम करतात. येथे रात्री 12 च्या दरम्यान गाऱहाणे घातले जाते. यावेळी सर्व भाविक मंदिराजवळ एकत्र येतात. या डोंगराला सिद्धा डोंगर म्हणून ओळखले जाते. नेत्रावळी अभयारण्यात हा भाग येत असून बाराजण-तिस्क, भाटी येथून मंदिराकडे जाता येते. तेथे वन्यजीव विभागाने फाटक उभे केलेले आहे. सागवानी लाकडासाठी हा डोंगर प्रसिद्ध आहे. वन खात्याने काही वर्षांपूर्वी डोंगरावर जाण्यासाठी पायऱया तयार केल्या होत्या. पण त्या खराब झाल्या आहेत.
या डोंगराचा पदभ्रमण-गिर्यारोहणासाठी अधूनमधून वापर होतो. डोंगरावर जाण्यासाठी सुमारे दीड तास, तर खाली उतरण्यास पाऊण ते एक तास लागतो. वन्यजीव विभागाने मंदिराच्या विकासासाठी व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलण्याची मागणी गावकऱयांकडून होत आहे. इको-टुरिझमखाली डोंगर परिसराचा विकास करण्याची मागणी स्थानिक करत आहेत. निसर्गसौंदर्याचा सुंदर आविष्कार येथे घडतो. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे सूर्यास्ताचे अविस्मरणीय दर्शन सायंकाळी येथून घेता येते. त्याचबरोबर साळावली धरणाच्या जलाशयाचे अप्रतिम चित्र पाहावयास मिळते. कारण डोंगराच्या मागच्या बाजूस धरण आहे. महाशिवरात्रीनिमित्त दरवषी होणारा हा उत्सव खूप प्रसिद्ध आहे. पणजीपासून भाटी हे अंतर 73 किलोमीटर, तर सांगे शहरापासून हे अंतर 9 किलोमीटर इतके आहे. डोंगरावर असलेले मंदिर पुरातन असून शेजारी काही घुमटय़ा व मूर्ती आहेत.