सांगेली/वार्ताहर –
सांगेली येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. या सोसायटीच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम राऊळ तर उपाध्यक्षपदी अंतोन रॉड्रिक्स यांची निवड करण्यात आली.यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून आर आर आरावंदेकर यांनी काम पाहिले.
यावेळी सोसायटीचे संचालक गुरुप्रसाद आत्माराम राऊळ, वामन भिकाजी नार्वेकर, प्रकाश शांताराम रेडीज, लवू रामचंद्र भिंगारे, विठ्ठल गोविंद सनाम, अशोक तुकाराम पवार, चैताली चंद्रकांत सांगेलकर, सदिच्छा चंद्रकांत सांगेलकर, सुहास जनार्दन सांगेलकर, ठकू भागू झोरे, रामनाथ विठ्ठल सांगेलकर उपस्थित होते.
यावेळी नूतन अध्यक्ष पुरुषोत्तम राऊळ यांनी संस्थेच्या सर्व संचालक मंडळ व गावातील सहकार क्षेत्रातील मान्यवरांना विश्वासात घेऊन या सोसायटीच्या प्रगतीसह शेतकरी व लघु उद्योजकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, उपसरपंच रमाकांत राऊळ, देवस्थानचे मानकरी पंढरी पुनाजी राऊळ, बाळा राऊळ, दीपक सांगेलकर, माजी उपसरपंच सुरजी राऊळ, सुनील राऊळ, बाबुराव कविटकर आदीनी नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.