वार्ताहर /कामुर्ली
सांगोल्डा मोन्ते व्हिला येथील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानचा 12 वा वर्धापनदिन बुधवार दि. 9 रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानिशी मोठय़ा उत्साहाने साजरा होणार आहे.
यानिमित्त बुधवार दि. 9 रोजी सकाळी ब्राह्मण भोजन व ब्राह्मणावर अभिषेक पूजा होईल. गुरुवार दि. 10 रोजी सकाळी महासंकल्प, पुण्याहवाचन पूर्वक महाविष्णूयाग, महापूर्णाहुती, महाप्रसाद, सायं. 4.30 वा. श्री विठ्ठल रखुमाई देवाची उत्सव मूर्तीची पालखीतून बँडच्या तालात गावातून मिरवणूक, दि. 11 रोजी सायं. 6.30 वा. यजमान प्रकाश साखळकरतर्फे दिवजोत्सव होईल. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकारी मंडळाने केले आहे.