ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशातील उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांना कोरोनाची बाधा झाली आहे. साक्षी महाराजांनी फेसबुक पोस्टद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
साक्षी महाराजांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, 162 बांगरमऊ पोटनिवडणुकीच्या तीन दिवसांच्या दौऱ्यानंतर मला अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर माझी कोरोना चाचणी सकारात्मक आली. डॉक्टरांनी मला 15 दिवस होम क्वारंटाईन केले आहे. पण माझी तब्बेत ठीक आहे. काळजी करण्याची गरज नाही. 15 दिवसांनंतर मी थेट आणि दूरध्वनीवर उपलब्ध होईल.
माझ्या निवासस्थानातील सर्व सहकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मागील 10 दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन साक्षी महाराजांनी केले आहे.