ऑक्टोबर – डिसेंबर 2021 मधील आकडेवारी : इस्माची माहती
प्रतिनिधी/ नवी दिल्ली
मागील वर्षातील ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये देशातील साखर निर्यात ही चारपट होत ती जवळपास 17 लाख टनाच्या घरात पोहोचली असल्याची माहिती साखर उद्योग संघटना इस्मा यांनी दिली आहे. सदरच्या निर्यात वाढीचे कारण म्हणजे विदेशातील वाढती मागणी हे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.
आतापर्यंत साखर कारखान्यांकडून निर्यातीसाठी 38 ते 40 लाख टन साखर निश्चित करण्यात आल्याची माहिती असून आगामी काळातही जागतिक पातळीवरील किमतीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता सांगितली जात आहे. बाजारामधील अहवाल आणि बंदरामधून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये 17 लाख टन साखर निर्यात करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मागील वर्षात समान कालावधीमध्ये जवळपास 4.5 लाख टन साखर निर्यात करण्यात आली होती. ब्राझिलमध्ये आगामी सत्रात 2022-23(एप्रिल-मार्च)च्या दरम्यान उत्पादनामध्ये कच्च्या साखरेसाठी जागतिक किमती घसरण राहिली आहे.
अन्य नोंदी
w महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी 15 जानेवारी 2022 पर्यंत 58.84 लाख टन साखर उत्पादन
w कर्नाटकमध्ये 15 जानेवारी 2022 पर्यंत साखर उत्पादन वधारुन 33.20 लाख टन