किंचीत वीजेची लखलखाट व गडगडाट. वीज गायब. किरकोळ झाडे पडण्याच्या घटना.
डिचोली / प्रतिनिधी
साखळी भागासह परिसरात किल मंगळ. दि. 12 मे रोजी दुपारी वादळी वाऱयासह पावसाने दमदार हजेरी लावल्याने काही काळ हवेत गारवा निर्माण झाला खरा. मात्र त्यानंतर साखळी भागात वीज गायब झाल्याने लोकांचे हाल झाले. काही ठिकाणी झाडे पडण्याच्या किरकोळ घटना घडल्या.
दुपारनंतर साखळीत ढगाळ वातावरण दिसून येत असतानाच अचानक वादळी वारा वाहू लागला. तसेच किंचित प्रमाणात वीचेचा लखलखाट आणि गडगडाटही झाला. आणि दि. 3 वा. च्या सुमारास वादळी वाऱयासह पावसाला सुरूवात झाली. सुमारे अर्धा तास दमदारपणे पाऊस कोसळला. जोरदार वाऱयामुळे साखळी भागातील बहुतेक परिसरात वीज गायब झाल्याने लोकांचे हाल झाले. अनेक भागांमध्ये दुपारी 2 वा. च्या सुमारास वीज गुल झाली होती. तर संध्याकाळपर्यंत सुरळीत झालीच नव्हती. वादळी वाऱयामुळे साखळी परिसरातील रस्त्यांवर लहान मोठय़ा झाडांच्या फांद्या पडल्या होत्या. तसेच अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहल्याने रस्त्यावर माती आणि चिखल आल्याचे निदर्शनास आले. मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेली गटरे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मोन्सूनपूर्व कामांच्या अंतर्गत साफ करण्यात न आल्याने या गटरांमधील पाणी रस्त्यावर आल्याचे दिसून आले. तसेच साखळी पुलावर मोठय़ा प्रमाणात चिखलमिश्रीत पाणी साचले होते. ते वाहनांमुळे चालत ये जा करणाऱया लोकांवर शिंपडत होते