ऑनलाईन टीम / कंपाला :
युगांडाची राजधानी कंपालामध्ये साखळी बॉम्बस्फोट झाला. पहिला स्फोट पोलीस ठाण्याजवळ तर दुसरा संसद भवनाजवळ झाला. संसद भवनाजवळील स्फोट या इमारतीमधील विमा कंपनीला लक्ष्य करुन करण्यात आला होता. या स्फोटात दोन जण ठार झाले. तर काही जण जखमी झाले आहेत. स्फोट झालेल्या ठिकाणापासून भारतीय पॅरा बॅडमिंटन संघ अवघ्या 100 मीटर अंतरावर होता. सुदैवाने भारतीय संघाला केणतेही नुकसान झाले नाही.
पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल-2021 मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय संघ काही दिवसांपूर्वीच युगांडा येथे पोहोचला आहे. यामध्ये प्रमोद भगत, मनोज सरकार यासह अन्य खेळाडू आहेत.