जन्म सोहळा रंगला, कोरोनाच्या संकट टळण्यासाठी केली आरती
सातारा प्रतिनिधी
रामनवमीचा सोहळा दरवर्षी सातारा शहरात काळाराम मंदिर, गोराराम मंदिर यासह ठिकठिकाणी मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो.मात्र, यावर्षी कोरोनाच संकट उभे असल्याने राम नवमीचा उत्सव रामभक्तांनी आपल्या घरातच साजरा केला.प्रभू रामाचा पाळणा घरातच कुटूंबातले सदस्यांनी म्हणून जन्मसोहळा साजरा केला.कोरोनाच्या संकटातून आपल्या देशाची लवकर सुटका होऊ दे अशी आळवणी करून भक्तांनी रामाची आरती केली.रात्री घरोघरी राम भक्तांनी दिवे लावले होते.
राम नवमीचा उत्सव मोठय़ा उत्साहात दरवर्षी सातारा शहरात ठिकठिकाणी साजरा केला जातो.यावर्षी कोरोनामुळे गर्दी जमवायची नाही, धार्मिक कार्यक्रम करायच नाही असा पोलीस प्रशासने सक्त निर्बंध घातले आहेत.या निर्णयाचे तंतोतंत सर्व रामभक्त मंडळींकडून पालन करत आपल्या घरात राम जन्म सोहळा साजरा केला.दरम्यान सातारा शहरातल्या काळा राम मंदिर, गोरा राम मंदिर या दोन्ही मंदिरात अतिशय सर्व नियमांचे पालन करत केवळ पुजायानी रामाचा जन्म सोहळा साजरा केला.कोरोनाचा लवकर या देशातून बंदोबस्त व्हावा अशी प्रार्थना ही रामभक्तांनी केली.आरती करून हे संकट लवकर टळू दे अशी आर्जव केली आहे.सायंकाळी काही भक्तांनी घरात दिवे पेटवले होते.