प्रतिनिधी / नागठाणे
वेणेगाव (ता.सातारा) येथील क्रांती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत सध्या कोरोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय योजना राबविल्या आहेत.त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनवाचून आपला जीव गमावावा लागू नये यासाठी मंडळाने ऑक्सीजन मशीन गावाला भेट दिली आहे.नुकताच या मशीनचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला.
कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सीजनविना व उपचारापासून वंचित राहणार नाही याकरिता आम्ही मंडळाचे कार्यकर्ते यांनी हा निर्णय घेतला असल्याचे मंडळाचे मार्गदर्शक राजेंद्र सावंत यांनी यावेळी सांगितले. माणिक सावंत,सुनील काटे यांच्या उपस्थित हा लोकार्पण कार्यक्रम पार पडला.यावेळी सरपंच मंगल यादव उपसरपंच वैशाली चव्हाण शालन पवार , ग्रामपंचायत सदस्य गणेश चव्हाण, आरोग्य सेविका व सेवक अंगणवाडी मदतनीस,आशा स्वयंसेविका प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होतउपस्थितांचे आभार आपत्ती व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी मानले