सातारा / प्रतिनिधी :
सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल यांनी दिलेल्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर संदिप शितोळे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सातारा शहरात दोन चंदन चोरट्यांना ताब्यात घेतले. शंकर भीमा चंदनवाले(वय 49, रा.शेंद्रे, ता. सातारा),संदीप कालिदास महाडिक(वय45, रा.यादोगोपाळ पेठ सातारा) अशी संशयितांची नावे आहेत.चंदनाची लाकडे घेवून ती विक्री करणेसाठी काशी विश्र्वेश्र्वर चौकात येताच त्यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे सुमारे साठ किलो चंदनाची लाकडे गाभ्यासहित मिळून आले. त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना काही एक स्पष्टीकरण देता येत नसल्याने लाकडे चोरीची असल्याची संशय पोलिसांना आल्याने त्यांचेकडून 33 हजार रुपयांचे चंदनाच्या लाकडांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांचे कडून चंदनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई सहा.पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक संदिप शितोळे , पो.हेड.को. हसन तडवी , पोलीस नाईक लैलेश अशोक फडतरे , अमित माने , स्वप्निल कुंभार , पो.कॉ.ओंकार यादव , मोहन पवार , पंकज मोहिते यांनी केली आहे.