सातारा/ प्रतिनिधी
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृह निर्माण योजना यांची प्रभावी अंमलबजावणी होणेसाठी ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडून महा आवास अभियान ग्रामीण हे अभियान राबविणेत आलेले आहे. या अभियानात चांगले काम केल्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेचा सन्मान करण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयात पुरस्काराचा सन्मान जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी स्वीकारला.
पुणे येथे सोमवारी पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृह निर्माण योजना यांची प्रभावी अंमलबजावणी होणेसाठी ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडून महा आवास अभियान ग्रामीण हे अभियान राबविणेत आलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील बेघर कुटुंबास स्वतःचे हक्काचे निवासस्थान मिळवून देणे हा प्रमुख उददेश दृष्टीक्षेपात ठेवून, घरकुल बांधकामाचे प्रगतीस गती यावी यासाठी हे अभियान प्रामुख्याने राबविण्यात आले. या अभियानात सातारा जिल्हा परिषदेने यशस्वी घोडदौड कायम ठेवत खालील प्रमाणे तब्बल 6 पुरस्कार प्राप्त केले आहेत. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण PMAY) विभागस्तरीय पुरस्कार तृतीय क्रमांक – सातारा जिल्हा परिषद, द्वितीय क्रमांक – पाटण तालुका, प्रथम क्रमांक – ग्रामपंचायत नाव ता पाटण, राज्यपुरस्कृत आवास योजना (रमाई), द्वितीय क्रमांक – सातारा जिल्हा तृतीय क्रमांक – पाटण तालुका, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण PMAY) व राज्यपुरस्कृत आवास योजना (रमाई एकत्रित द्वितीय क्रमांक – पाटण तालुका यांचा सन्मान करण्यात आला.