सातारा :
सातारा जिल्हा बँकेचा लांबलेला निवडणूक कार्यक्रम अखेर शनिवारी जाहीर झाला. त्यानुसार, सोमवारी 18 ऑक्टोबरला अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. 21 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल.
सोमवारपासून सातारा जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम सुरू होत आहे. दि. 18 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत अर्ज दाखल करुन घेतले जातील. 26 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. 27 रोजी उमेदवार यादी प्रसिद्ध होणार आहे.
27 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू राहिल. 11 नोव्हेंबरला चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 5 या वेळेत मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.