प्रतिनिधी/सातारा
मुंबईवरून आल्या नंतर पॉझिटिव्ह निघालेल्या 54 वर्षीय व्यक्तीचे 14 आणि 15 दिवसाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे आता तो कोरोना मुक्त झाला आहे. या व्यक्तीला क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथून आज घरी सोडण्यात आले. डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून आणि टाळ्यांच्या गजरात त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
काल, शनिवारी, कराड तालुक्यात सर्वांत प्रथम तांबवे येथील एक 35 वर्षीय युवकाचे दोन्ही रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्याला कृष्णा हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स व स्टाफने टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज दिला. यानंतर आज दुसर्या कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याने जिल्ह्यात दिलासा देणारी ही बातमी आहे.