सातारा/प्रतिनिधी
जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 1205.50 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 13.25 मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 7.38 (268.80) मि. मी., जावळी- 25.18 (476.16) मि.मी. पाटण-21.18 (437.55) मि.मी., कराड-3.85 (213.23) मि.मी., कोरेगाव-3.67 (196.11) मि.मी., खटाव- 1.73 (188.38) मि.मी., माण- 0.00 (129.86) मि.मी., फलटण- 0.78 (163.89) मि.मी., खंडाळा- 6.45 (143.45 ) मि.मी., वाई – 16.00 (281.60) मि.मी., महाबळेश्वर-122.35 (1368.86) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 3867.87 मि.मी. तर सरासरी 351.62 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.