प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेला सर्व सर्व साधारण सभेला मुहूर्त लागेना झाला आहे.कोरोनामुळे ब्रेक लागला असून तब्बल सात महिने सभाच झाली नाही.गेल्या महिन्यात बांधकाम समितीची सभा झाली अन कामाला प्रारंभ झाला.सर्वसाधारण सभा काढण्याच्या हालचाली सुरू असतानाच पुणे पदवीधरची आचारसहिंता लागली आता ही आचारसंहिता संपल्यावर पुन्हा दि.5पासून सभा घेण्यासाठी हालचाली सुरू होतील.सभाच नसल्याने विकास कामांना ब्रेक लागला आहे.नगरविकास आघाडीचे नगरसेवक अविनाश कदम, अमोल मोहिते आणि भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांनी सर्वसाधारण सभा ही ऑन लाईन न घेता सोशल डिस्टनन्सने घ्यावी अशी वारंवार मागणी केली आहे.
सातारा नगरपालिकेची लॉक डाऊन पूर्वी अर्थ संकल्पीय सभा झाली होती.त्यांनंतर सभाच झाली नाही.शासनाने त्यानंतर सभा ऑन लाईन घेण्याचे परिपत्रक काढले होते.त्यानुसार सातारा पालिकेने तयारी केली तत्पूर्वी छत्रपती शाहू कला मंदिरात सभेला परवानगी मिळावी अशी मागणी करणारे पत्र नगराध्यक्ष माधवी कदम यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवले होते.त्यास परवानगी मिळाली नव्हती.ऑन लाईन स्थायी समितीची सभा घेते वेळी तांत्रिक बाबी निर्माण झाल्या होत्या.त्यामुळे दोन वेळा ऑन लाईन कशी तरी सभा झाली पुन्हा गत महिन्यात बांधकाम सभापती मिलिंद काकडे यांनी बांधकाम समितीची सभा घेतली त्याच वेळी सर्वसाधारण सभेचा अजेंडा काढण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्या हालचाली पुढे थांबल्या.पालिकेच्या इमारतीत नेट चालत नसल्याने नवीन नेट घेतले तेही तसेच झाले.याच दरम्यान ऑन लाईन सभेवर स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष निवडी पार पडल्या.त्याच वेळी नगरसेवक अविनाश कदम, अमोल मोहिते आणि धनंजय जांभळे यांनी पत्र देऊन सभा ऑन लाईन न घेता प्रत्यक्ष घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे.पुणे पदवीधरची निवडणूक संपल्यावर पालिकेच्या सर्वसाधारण सभेला मुहूर्त लागणार आहे, अशी चर्चा आहे.