प्रतिनिधी / सातारा
सातारा पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडी आज ऑन लाईन होत आहेत.त्याच अनुषंगाने काल प्रांत कार्यालयात कागदपत्रे जमा करण्यासाठी भाजपच्या गोटातून चार जण गेले होते. दुपारी एक वाजता जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचा फोन खणानला अन सुनील काळेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाली.त्यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.
सातारा पालिकेत भाजपच्या कोटय़ातून असलेल्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या रिक्त जागेसाठी दि.21रोजी ऑन लाईन निवडी होणार आहेत.भाजपमधून 11 जण इच्छुक होते. एकेक नाव मागे पडत गेले. काल कागदपत्रे तपासणी करता प्रांत कार्यालयात चौघे गेले होते.त्यामध्ये निष्ठावंत जयदीप ठुसे, सुणेशा शहा, डॉ.उत्कर्ष रेपाळ आणि सुनील काळेकर यांचा समावेश होता.जयदीप ठुसे यांच्या नावावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता होती परंतु दुपारी 1 वाजता जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचा फोन आला की सुनील काळेकर यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा यांनी चिठी काढली आहे.त्यांचाच अर्ज भरा.तसा आदेश मिळताच सुनील काळेकर यांनी आपला अर्ज दाखल दुपारी काळेकर यांची बिन विरोध निवड करण्यात आली.त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.