राज्यभरातील 220 कवींनी शब्दमाला गुंफल्या
दहा दिवसांनी कवितांच्या पुस्तकांचे होणार प्रकाशन
प्रतिनिधी / सातारा
कौशल्य कुशल…तेजस्वी तारका…तिन्ही लोकी विजयी डंका, या प्रा.विलास गायकवाड यांच्या कवितेने सुरुवात झाली ती राज्यभरातल्या 220 कवींनी आपल्या शब्दांत शब्दसुमनांनी अनोख्या पध्द्तीने सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना शुभेच्छा देण्यात आल्या.या 220 कवितांचे पुस्तक दहा दिवसांनी त्यांच्याच हस्ते प्रकाशित करून त्यांच्याप्रती एक अनोखी भेट देण्यात येणार आहे.
सातारच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा वाढदिवस रविवार दि. 19रोजी होता. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यातील त्यांच्या चाहत्यांनी रविवारी सकाळी भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहा वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. सुरुवातीला लातूर येथील प्रा. विलास गायकवाड यांनी कविता लिहली. त्यांच्यानंतर असे तेजस्वी तारका… थरथर कापे गुन्हेगार… नाव लौकिक तुझा रहावा…नष्ट व्हावा भ्रष्टाचार ही अशोक कांबळे मुंबई यांची, तारका ती तेजस्वी… कणखर ती माणिनी… वाटे ती रणरागिणी ही जयश्री बापट पुणे यांनी कविता लिहून शुभेच्छा दिल्या. अशा तब्बल 220 कवींनी आपल्या शब्द सुमनानी काव्य लेखन करून शुभेच्छा देण्यात आल्या. स्पर्धेच्या आयोजिका संगीता माने आणि प्रिया इंगळे या होत्या.