सातारा / प्रतिनिधी :
मद्यपान करून टेम्पो चालवल्याप्रकरणी जावली तालुक्यातील पार्टेवाडी येथील युवकावर वाई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुशांत तुळशीदास पार्टे (वय 24) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
यासंदर्भात वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 31 डिसेंबरच्या अनुषंगाने रात्री गस्त सुरु असताना रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास वाई ते मांढरदेव जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी चौकात पार्टे हा मद्यपान करून टेम्पो (छोटा हत्ती एमएच 11 सीएच 8248) चालवत निघाला होता. पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्यास रोखले. त्याच्यावर मोटर वाहन कायदा कलम 185 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.