प्रतिनिधी / वाई
वाई तालुक्यातील धावली गावच्या हद्दीत धोम धरणाच्या पात्रालगत असलेल्या जंगली झाडास हेमंत दामोदर सोनवणे ( वय 37, रा.ओझर्डे ) यांनी गळफास लावुन घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली असून ते महाबळेश्वर आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. दि.31 रोजी 10.30 वाजता ही घटना उघडकीस आली असून याची खबर सचिन दामोदर सोनवणे यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय मोतेकर हे करत आहेत.