प्रतिनिधी / सातारा
मुधाईदेवी विद्यामंदिर देऊरचे माजी प्राचार्य व शरद बिगरशेती सहकारी पतसंस्था वाठार स्टेशनचे चेअरमन बाळकृष्ण रामचंद्र चव्हाण यांना रोटरी क्लब ऑफ सातारा यांचा रोटरी कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष ऍड.सुधीर ससाणे,सचिव रो.संदीप भागवत, मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे विश्वस्त अरविंद कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य बाळकृष्ण चव्हाण यांना दिलेल्या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आहे.त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.