प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरात दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.पाचच मिनिटात सगळे रस्ते निसरडे करून पाऊस थांबला. छत्र्या बाहेर निघाल्या. शहरात राजवाडा ते शाहू चौक पर्यंत पाऊस झाला तर शाहू चौक ते पोवई नाका या दरम्यान रस्ता ओला करण्यापर्यंत पाऊस झाला.
जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला. तसेच सातारा जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस झाला. दुपारी वाई येथे पाऊस झाला. कराड येथे पावसाचे वातावरण होते.