आ. शिवेंद्रसिंहराजे; शाहुनगरसाठी नवीन प्रस्ताव पाठवण्याच्या केल्या सुचना
प्रतिनिधी / सातारा
सातारा- शाहूपूरीवासीयांचा पाणीप्रश्न कायमस्वरुती सुटण्यासाठी शाहुपूरीच्या सुधारीत पाणीपुरवठा योजनेसाठी वाढीव १२ कोटी रुपये निधी नुकताच मंजूर करुन घेतला आहे. वन विभाग आणि वीज वितरण कंपनीच्या अडचणीबाबत संबंधीत अधिकार्यांनाही सुचना केल्या आहेत.
पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु करण्यासाठी कोणतीही अडचण राहिली नाही. त्यामुळे शाहुपूरी पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने सुरु करा आणि ते लवकरात लवकर पुर्ण करा, अशा सुचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती पल्लवी चौगुले यांना केल्या. तसेच शाहूनगर त्रिशंकू भागाचा समावेश नगर पालिका हद्दीत झाला असल्याने या भागाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी नवीन योजनेचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याची सुचनाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केली.
शाहुपूरी पाणीपुरवठा योजनेसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून पुर्वीच ३१.३१ कोटी निधी मंजूर झाला होता.
सध्या या योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान, उर्वरीत पाईपलाईनचे काम, टाक्या, नळजोडणी आदीसाठी वाढीव निधी मिळणे आवश्यक होते. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी शाहुपूरी येथील सुधारीत पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाला नुकतीच मंजूरी मिळवून १२ कोटी रुपये निधी मंजूर घेतला. आता हे काम तातडीने मार्गी लागावे यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्राधिकण कार्यालयात जावून श्रीमती चौगुले यांची भेट घेतली आणि योजनेचा आढावा घेतला. यावेळी शाहुपूरीचे भारत भोसले, पिंटू कडव, बबलू जाधव, राजेंद्र मोहिते, विकास देशमुख, तुषार जोशी, पंचायत समितीचे सदस्य आशुतोष चव्हाण, फिरोज पठाण, कॉन्ट्रक्टर दिपक भिवरे, दरे ग्रामपंचायतीचे सरपंच माने आदींसह शाहुपूरी आणि शाहूनगर येथील नागरिक उपस्थित होते.