●दुपारी 2 च्या आत घरातला नागरिकांचे सहकार्य,
● दहा दिवसांत तब्बल 600 च्या वर बाधित,
● 60 जण कोरोना मुक्त
● कोरोनामुक्ती हजारावर
प्रतिनिधी/सातारा
राज्याबरोबरच सातारा जिल्हय़ातही कोरोना संसर्गाचा वेग मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. जिल्हय़ात 1 जुलै रोजी असणारा 1045 हा बाधितांचा आकडा केवळ 10 दिवसांत 1671 वर पोहोचल्याने जिल्हावासियांना धडकी बसली आहे. तसेच या काळात तब्बल 25 बळी वाढल्याने प्रशासनाने कडक पावले उचलत दुपारी 2 नंतर सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश काढले आहेत. सातारा, फलटण शहरासह जिल्हय़ातील दहा गावे हॉटस्पॉट ठरली असून या गावातील साखळय़ा तोडण्याचे प्रशासनापुढे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 60 नागरिकांना शनिवारी दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. दरम्यान रात्री उशिरा 70 बाधीत अहवाल आल्यामुळे जिल्हा हादरला आहे.
जिल्हय़ात गेल्या दहा दिवसांपासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. दररोज 50 ते 100 बाधित रुग्णांमुळे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणारा सातारा पुन्हा झेपावला आहे. बाधितांची संख्या कमी करायची असेल तर लॉकडाऊन कडक हवा अशीच सगळय़ांची भावना झाली होती. प्रशासनाने हाफ लॉकडाऊन करुन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. नागरिकही प्रशासनास सहकार्य करत आहेत.
जिल्हय़ातील तब्बल 403 गावे कोरोनाग्रस्त झाली असून यातील दहा गावे हॉटस्पॉट ठरली आहेत. यामध्ये सातारा तालुक्यातील जिहे गावात तब्बल 56 बाधित रुग्ण आहेत. त्याखालोखाल शिरवळ, तारुख, म्हासोली, रामवाडी, मलकापूर, तुळसण, चोरगेवाडी, पसरणी ही गावे आहेत. सुरुवातीला हॉटस्पॉट ठरलेली वनवासमाची आजमितीला कोरोनामुक्त आहे.
कोरोना बाधितांचा चढता आलेख शुक्रवारी सुरुवातीला काहीसा उतरलेला पहायला मिळाला होता. केवळ 12 जणांचे अहवाल बाधित म्हणून आल्यामुळे जिल्हावासीयांना हायसे वाटले होते, परंतु रात्री उशिरा पुन्हा 46 बाधितांचे अहवाल आल्याने सातारकरांची झोप उडाली. 70 बाधीत अहवालामुळे शनिवारी त्याचीच पुनरावृत्ती झाली.
जिह्यातील 46 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित
आरोग्य विभागाकडून शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिह्यातील निकट सहवासित 41, सारीचे 2 आणि प्रवास करुन आलेले 3 असे एकूण 46 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
कराड तालुक्यातील मलकापूर येथील 54 व 47 वर्षीय महिला, वाण्याचीवाडी येथील 62 वर्षीय महिला, बनपूरी कॉलनी येथील 53 वर्षीय पुरुष, धावरवाडी येथील 8 वर्षाचा बालक, यादववाडी येथील 43 वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातील निमसोड येथील 33 वर्षीय महिला, 14 वर्षीय बालक, बनपुरी येथील 38 वर्षीय पुरुष, वडूज येथील 34 वर्षीय पुरुष, निढळ येथील 18 वर्षीय तरुण. वाई तालुक्यातील व्याहळी कॉलनी येथील 45 वर्षीय पुरुष. सातारा तालुक्यातील जिहे येथील 19 वर्षीय तरुण, 70 वर्षीय महिला, करंडी येथील 70,65 व 45 वर्षीय महिला, राधिका रोड येथील 39.27,31 व 48 वर्षीय महिला, करंजे येथील 45,25,23 व 56 वर्षीय महिला, भरतगाव येथील 77, 15, व 51 वर्षीय पुरुष, 74, 45 व 44 वर्षीय महिला, बोरगाव येथील 12 वर्षाचा बालक, 44 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला, गार्डन सिटी येथील 31 वर्षीय पुरुष. जावली तालुक्यातील सरताळे येथील 56 वर्षीय पुरुष, पुनवडी येथील 67 वर्षीय पुरुष,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 7 वर्षाचे बालक, 42, 65, 35 वर्षीय महिला, शिंदेफाटा शिरवळ येथील 25 वर्षीय पुरुष, उमाजीनाईक शिरवळ येथील 14 वर्षाचे बालक, महाबळेश्वर येथील 45 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील निगोडे (उमरकांचन) येथील 57 वर्षीय महिला, साईकडे येथील 24 वर्षीय महिला.
60 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 60 नागरिकांना शनिवारी दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 34 व 28 वर्षीय पुरुष, 31,75,19 व 40 वर्षीय महिला, तांबेआळी येथील 50 वर्षीय पुरुष, चव्हाण आळी शिरवळ येथील 20 वर्षीय तरुण, शिंदेवाडी येथील 36 व 30 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील आशबी कंपनी येथील 21 वर्षीय तरुण,
सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली येथील 50 वर्षीय पुरुष, अपशिंगे येथील 18 वर्षीय तरुण, करंजे येथील 40 वर्षीय पुरुष, खावली येथील 46 वर्षीय पुरुष, लिंब येथील 40 वर्षीय पुरुष.
पाटण तालुक्यातील चोपडी येथील 60 वर्षीय महिला,
कराड तालुक्यातील आगाशिवनगर येथील 32 व 24 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 62 वर्षीय पुरुष,53 वर्षीय महिला, वडगांव येथील 28 वर्षीय महिला, गोवारे येथील 24 वर्षीय पुरुष, कोयनावसाहत येथील 40 वर्षीय पुरुष, तारुख येथील 40, 60 वर्षीय पुरुष, खंडोबानगर मलकापूर येथील 33 वर्षीय महला, जखीनवाडी येथील 23 वर्षीय महिला, रुक्मिणीनगर येथील 39 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 22 व 26 वर्षीय पुरुष, 70,45व 23 वर्षीय महिला, 32 वर्षीय ग्रामीण रुग्णालय कराड येथील आरोग्य सेवीका, हजारमाची येथील 35 वर्षीय पुरुष, गोलेश्वर येथील 12 वर्षाचा बालक, 36 वर्षीय महिला,
खटाव येथील 62 वर्षीय पुरुष,
वाई तालुक्यातील सोनगीरवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, 55 व 27 वर्षीय महिला, 11 वर्षाचे बालक,खानापुर येथील 49 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष,981 ब्राम्हणशाही येथील 72 वर्षीय पुरुष 27 वर्षीय महिला व 4 वर्षाचे बालक व 8 वर्षाची बालीका, सोनजी विहार बावधन नाका येथील 40 वर्षीय महिला, 20 व 16 वर्षीय तरुणी, शिरगांव येथील 31 वर्षीय पुरुष, खडकी येथील 53 वर्षीय पुरुष 42 वर्षीय महिला व 22,17 व 15 वर्षीय तरुण
कोरेगांव तालुक्यातील तडवळे येथील 34 वर्षीय महिलाव 6 वर्षाची बालीका.
490 जणांच्या घशातील नमुना पाठविला तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 21, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 44, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 67, ग्रामीण रुग्णालय फलटण येथील 18, कोरेगांव येथील 51, वाई येथील 64,शिरवळ येथील 91, रायगांव येथील 54, पानमळेवाडी येथील 24, मायणी येथील 37, महाबळेश्वरयेथील 5, खावली येथील 14 असे एकूण 490 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्याता आले असून एन. सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
जिल्हय़ात शनिवारपर्यंत
घेतलेले एकुण नमुने 17133
एकुण बाधित 1671
एकुण मुक्त 1010
एकुण बळी 65
जिल्हय़ात शनिवारी
कोरोना बाधित 70
कोरोना मुक्त 60
बळी 00