प्रतिनिधी / सातारा
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक लागली आहे. अर्ज भरण्याची पहिल्या दिवशी पुणे येथे जाऊन सातारा येथे सामाजिक कार्यकर्ते सागर भिसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सागर भिसे यांनी यापूर्वी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ही आपले अर्ज दाखल केल्याचा अनुभव त्यांना आहे. त्यांनी पहिलाच अर्ज दाखल केला असून सातारा जिल्ह्यातील आणखी कोण कोण अर्ज दाखल करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.