प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील जुना मोटार स्टँड परिसरात चोरीच्या मोटारसायकलसह मोबाईल, दागिने असा ऐवज जवळ बाळगल्याप्रकरणी शाहूपुरी डीबीने ताब्यात घेतलेले दोन संशयित चेनस्नेचर निघाले असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. गितेश दत्तात्रय नावडकर (वय 24) व तुषार अनिल शेलार, (वय 23, दोघे रा. पाडळी, ता. सातारा) अशी अटक केलेल्या चोरटय़ांची नावे असून त्यांच्याकडून 75 हजार 900 रुपयांचा चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना गितेश नावडकर व तुषार अनिल शेलार हे दि. 15 रोजी सायंकाळी संशयितरित्या फिरताना आढळून आले. शाहूपुरीच्या डीबी पथकाने त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता रेवडी, ता. कोरेगावचे हद्दीत, इस्लामपुर जि.सांगली हद्दीत व वेचले ता. सातारा गावचे हद्दीत असे तीन ठिकाणी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडील 25 हजार रुपयांची मोटार सायकल, 15 हजारांचे पिवळय़ा धातुचे मणी, 15 हजारांची बोरमाळ, 20 हजारांचे दोन किंमती मोबाईल, रेनकोट, सॅक आढळून आले ते जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, पोलीस नाईक लेलेश फडतरे, अमित माने, स्वप्निल कुंभार, कॉन्स्टेबल पंकज मोहिते, ओंकार यादव, मोहन पवार व जिल्हा विशेष शाखेचे पोलीस नाईक राकेश खांडके व हेडकॉन्स्टेबल शेलार यांनी केली आहे.