शहर पोलिसांची कारवाई ः दोन जण ताब्यात
प्रतिनिधी/ सातारा
एमआयडीसी पोलीस चौकी ते फुलोरा हॉटेलला जाणाऱया मार्गावर बेकायदेशिररित्या गुटख्याची वाहतूक करणाऱया ट्रकला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी शंकर केरू केदार (वय 38), सुभाष हरिभाऊ घगु (वय 62, रा. धनकवडी, पुणे) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना सातारा शहर परिसरातून एका टेंम्पोमधून गुटख्याचा माल पुण्याकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक समीर कदम व डी. बी. पथक, इतर पोलिसांच्या मदतीने दि. 30 रोजी 2.45 वाजण्याच्या सुमारास एम. आय. डी. सी. परिसरामध्ये टेंम्पो (क्रं. एमएच 12 एसएक्स.2726) हा ताब्यात घेण्यात आला. या टेम्पोंचे चालक शंकर केरू केदार, सुभाष हरीभाऊ घुगे यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी टेंम्पोमध्ये गुरांचे खाद्याचा भुसा व चिरमुरे असल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी पाहणी केल्याने टेंम्पोच्या मागील हौद्यामध्ये पुढील बाजुस भुसा व चिरमुरेची पांढऱया रंगाची पोती दिसून आली. आणि मागील बाजुस विमल गुटख्याची 38 पोती मिळून आली. हा गुटखाचा माल 17 लाख रूपये, टेंम्पो 10 लाख रूपये किंमतीचा असा एकून 27 लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे.
या कारवाईत पोलीस नाईक सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, पोलीस कॉन्टेबल गणेश घाडगे, संतोष कचरे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, गणेश भेंग, सचिन देवकर, निलेश निकम, माने यांनी घेतला.