प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहरात अग्निशमन दलाच्या गाडीच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण फवारणी केली जात आहे. सोमवारी सकाळी जंगी वाडा परिसरातूनपुढे ही निर्जंतुकरणाची फवारणी केली जात असताना कोल्हटकर आळीमध्ये भुयारी गटर योजनेच्या खोदलेल्या चरीत या गाडीचे चाक अडकले. ही गाडी अडकल्याने निर्जंतुकीकरण मोहिम थांबली गेली. क्रेन आणून अडकलेली अग्निशमनची गाडी काढण्याचा प्रयत्न सुरु होता.